Special Report | 13 अपक्ष, 13 छोटे पक्ष नेमके कोणासोबत? -tv9
राज्यसभेची 6 वी जागा, शिवसेना आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची झालीय..पण भाजपचे धनंजय महाडिक असो..की शिवसेनेचे संजय पवार, विजयासाठी अपक्षांबरोबरच छोट्या पक्षांच्या मतांची आवश्यकता आहेच..अपक्ष एकूण 13 आमदार आहेत.
राज्यसभेची 6 वी जागा, शिवसेना आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची झालीय..पण भाजपचे धनंजय महाडिक असो..की शिवसेनेचे संजय पवार, विजयासाठी अपक्षांबरोबरच छोट्या पक्षांच्या मतांची आवश्यकता आहेच..अपक्ष एकूण 13 आमदार आहेत. या सर्व आमदारांची पार्श्वभूमी आणि त्यांची वाटचाल पाहिली तर भाजपच्या बाजूनं 13 पैकी 5 अपक्ष आमदार आहेत. आणि 8 आमदार हे शिवसेनेच्या बाजूनं दिसतायत आता हे 13 आमदार कोण आहेत, तेही पाहुयात…रवी राणा बडनेऱ्याचे आमदार आहेत, ते भाजपलाच मतदान करतील यात कोणाच्याही मनात शंका नाही. विनोद अग्रवाल, गोंदियाचे आमदार आहेत. पूर्वाश्रमीचे ते भाजपचेच नेते. सध्या भाजपला समर्थन देत असल्यानं ते भाजपलाच मतदान करणार
महेश बालदी, उरण आमदार. बालदी पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आहे. आणि आता भाजपच्या बाजूनं असल्यानं भाजपलाच मतदान करतील असं दिसतंय.
Published on: Jun 04, 2022 09:25 PM