Special Report | अनिल देशमुख, नवाब मलिकांचं मत सेनेसाठी निर्णायक?-TV9

| Updated on: Jun 01, 2022 | 8:46 PM

निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर महाविकास आघाडीनंच एक उमेदवार मागे घ्यावा...नाही तर 3 पैकी एका पक्षाचा एक उमेदवार पडेलच, असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिलाय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन एक बाब स्पष्ट झाली…की राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक शेवटपर्यंत लढणार..म्हणजे महाडिक माघार घेणार नाहीत…कारण निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर महाविकास आघाडीनंच एक उमेदवार मागे घ्यावा…नाही तर 3 पैकी एका पक्षाचा एक उमेदवार पडेलच, असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिलाय… राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी 42 मतांची आवश्यकता आहे.. भाजपच्या दाव्यानुसार, 2 उमेदवार निवडणूक गेल्यानंतर 29 मतं शिल्लक राहतात. तर धनंजय महाडिक म्हणतात की 11 मतांची सोय केलीय. म्हणजेच 29 आणि 11 अशी मतांची बेरीज केली तर एकूण 40 मतं होतात. तसंच सध्या MIM आणि मनसेनं पत्ते उघड केले नाहीत. शिवसेनेच्या दाव्यानुसार, मविआचे 3 उमेदवार निवडून गेल्यानंतर 43 मतं राहतात. पण राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. त्यामुळं त्या दोघांच्या मतांबद्दल तूर्तास साशंकता आहे. जर मलिक आणि देशमुखांना मतदान करता आलं नाही तर, मविआचा आकडा 41 वर येईल.

पण राष्ट्रवादीकडून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या मतासाठी कोर्टात धाव घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. याआधी 2017मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ आणि रमेश कदम यांना मतदानाचा हक्क बजावण्याची मुभा देण्यात आली होती. तर भाजपनं कितीही घोडे उधळले तरी राज्यसभेच्या 6 व्या जागेवर शिवसेनेचे संजय जाधवच जिंकणार असं संजय राऊतांनी म्हटलंय. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झालीय…त्यातच भाजप महाडिकांवरुन ठाम राहत असल्यानं, मतं फुटणार की काय ? यावरुन महाविकास आघाडीत धाकधूक तर निर्माण झालीच आहे.

Published on: Jun 01, 2022 08:46 PM
Sanjay Raut : पंतप्रधानही लोकपाल अंतर्गत यायला हवेत, संजय राऊत यांचं मत
Special Report | भाजप महिलांच्या टार्गेटवर सेनेच्या दिपाली सय्यद?-TV9