Special Report | गोष्ट सदाभाऊ खोतांच्या उधारीची-tv9
कार्यकर्त्यानं चारचौघात उधारी मागितली आणि तिही थेट माजी मंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांना. काल सदाभाऊ सांगोल्याच्या दौऱ्यावर होते. सांगोल्यात पोहोचलेल्या सदाभाऊंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत सुरु होतं. पण तेवढ्यात एका कार्यकर्त्यानं सदाभाऊंना थेट उधारीच मागायला सुरुवात केली.
कार्यकर्त्यानं चारचौघात उधारी मागितली आणि तिही थेट माजी मंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांना. काल सदाभाऊ सांगोल्याच्या दौऱ्यावर होते. सांगोल्यात पोहोचलेल्या सदाभाऊंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत सुरु होतं. पण तेवढ्यात एका कार्यकर्त्यानं सदाभाऊंना थेट उधारीच मागायला सुरुवात केली. अचानक उधारी मागितल्यानं सदाभाऊ थोडे हडबडले. सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल मालकाची समजूतही काढण्याचा प्रयत्नही केला. पण हॉटेल मालक कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मग शेवटी राहिलेली उधारी देऊ असं सांगून सदाभाऊंनी वेळ मारुन नेली. २०१४ साली सदाभाऊंनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांविरोधात सदाभाऊ रिंगणात होते.. त्याचवेळची ही उधारी असल्याचं हॉटेल मालकाचं म्हणणं आहे. सदाभाऊंवर आरोप करणाऱ्या अशोक शिनगारेंचा सांगोल्यात ढाबा आहे. ढाब्याचं नाव आहे..मामा भाचे ढाबा..