Special Report | 18 दिवसांपासून गायब Sandeep Deshpande, धुरींना अटकपूर्व जामीन!-TV9
देशपांडेंनी आपली भूमिका व्हिडीओद्वारे स्पष्ट करत महिला पोलीस कॉन्स्टेबलला धक्का लागला नसल्याचं म्हटलं होतं. आता कोर्टातूनच देशपांडे आणि धुरींना अटकपूर्व जामीन मिळाला. पण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत 18 दिवस हे दोघेही पोलिसांच्याही हाती लागले नाही.
तब्बल 18 दिवसांपासून गायब असलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय..या दोघांना अटी शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. प्रत्येकी 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. 23 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजताच्या दरम्यान पोलीस चौकीत हजर राहावं लागणार. तसंच प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आणि 16 तारखेला शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. राज ठाकरेंनी 3 मे रोजी औरंगाबादच्या सभेत, मशिदीवरील भोंगे बंद करा. नाही तर मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली. 4 मे रोजी राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही गाडीत बसून सुसाट निघाले. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी माळी यांना कारचा मागचा दरवाजा जोरात लागल्यानं त्या खाली पडल्या.. यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरींवर 5 कलमं लावली…
मात्र आता जामीन मिळताच, संतोष धुरींनी सत्य पराभूत होत नाही, असं ट्विट केलंय. तर सरकारची सूडबुद्धी कायद्यासमोर यापुढंही टिकणार नाही, असं भाजपचे आशिष शेलार म्हणालेत. 4 तारखेपासून संदीप देशपांडे आणि संतोष नॉटरिचेबल होते..मात्र जे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले, त्यावरुन देशपांडेंनी आपली भूमिका व्हिडीओद्वारे स्पष्ट करत महिला पोलीस कॉन्स्टेबलला धक्का लागला नसल्याचं म्हटलं होतं. आता कोर्टातूनच देशपांडे आणि धुरींना अटकपूर्व जामीन मिळाला. पण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत 18 दिवस हे दोघेही पोलिसांच्याही हाती लागले नाही.