Special Report | नवनीत राणांवर ‘डी’ कंपनीवरून आरोप!-TV9

| Updated on: Apr 27, 2022 | 9:24 PM

सध्या जेलमध्ये असलेल्या खासदार नवनीत राणांवर थेट दाऊद कनेक्शनवरुन आरोप... राऊतांनी नवनीत राणांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती ट्विट करुन गंभीर आरोप केलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित युसूफ लकडावालाकडून, नवनीत राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप राऊतांचा आहे. युसूफ लकडावालाचं 8 महिन्यांआधी ईडीच्या कोठडीत असताना मृत्यू झालाय.

सध्या जेलमध्ये असलेल्या खासदार नवनीत राणांवर थेट दाऊद कनेक्शनवरुन आरोप…
राऊतांनी नवनीत राणांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती ट्विट करुन गंभीर आरोप केलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित युसूफ लकडावालाकडून, नवनीत राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप राऊतांचा आहे. युसूफ लकडावालाचं 8 महिन्यांआधी ईडीच्या कोठडीत असताना मृत्यू झालाय. लकडावाला हा मुंबईला बिल्डर आणि दाऊदच्या डी कंपनीचा फायनान्सर होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात लकडावालाला ईडीनं अटक केली होती. कॅन्सरग्रस्त असलेल्या लकडावालाचा 9 सप्टेंबर 2021ला कोठडीतच मृत्यू झाला. अहमदाबादमधून लंडनमध्ये पळून जात असताना अटक झाली होती. आता याच दाऊदशी संबंधित लकडावालाकडून जर नवनीत राणांनीही कर्ज घेतलं. तर त्यांची चौकशी का नाही ?, फडणवीस कधी बोलणार ?, असा सवाल राऊतांचा आहे. दुसरीकडे भाजपच्या मोहित कंबोज यांनी, लकडावालाशी तर शरद पवारांचे चांगले संबंध होते ?, त्यावर राऊत कधी बोलणार, अशी टीका केलीय.

ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक दाऊदशी संबंधित व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्यावरुनच जेलमध्ये गेलेत. 1993च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार सरदार शहावली खान आणि सलीम पटेलकडून जमीन खरेदीचा आरोप आहे. ईडीकडून मलिकांचे मुंबईतले 5 फ्लॅटसह 9 संपत्ती जप्त केलीय. मग दाऊदशी संबंधित व्यवहारावरुन जर मलिकांना अटक झाली तर मग नवनीत राणांवर का नाही ?, असा सवाल राष्ट्रवादीचाही आहे. संजय राऊतांनी फक्त लकडावालावरुनच आरोप केले नाहीत. तर भोंगे आणि हनुमाना चालीसाचा वाद निर्माण करण्यासाठीही डी कंपनीकडून पैसा पुरवला जात असल्याचा दावाही राऊतांनी केलाय. राऊतांनी डी कंपनीवरुन राणा दाम्पत्याला घेरलंय. मात्र पुरावे असतील तर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करा, असं भाजपचे नितेश राणे म्हणालेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार, हे गृहराज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन स्पष्ट झालंय. एकीकडे डी कंपनीवरुन राऊतांनी राणांवर गंभीर आरोप केलेत. तर इकडे नवनीत राणांनी राऊतांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय.

अमरावती लोकसभेतून मी अनुसूचित जातीची सदस्य आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मला बदनाम करत आहेत. कारण मी चांभार जातीची आहे. गेल्या 2 दिवसांत त्यांनी मला आणि माझ्या पतीला बंटी बबली म्हटलं आणि बदनामीलाठी मला 420 सुद्ध म्हटलं. मुंबईत घरी असतानाही राऊतांनी कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन पाठवलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. आणि घराबाहेर अॅम्ब्युलन्स सुद्धा पाठवली. राऊतांनी मला आणि माझ्या पतीला 20 फूट खड्ड्यात गाडण्याची धमकी दिलीय. आणि स्मशानात तयारी करुन ठेवणार असंही म्हटलंय. त्यामुळं राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. म्हणजेच डी कंपनी विरुद्ध अॅट्रॉसिटी असा सामना नवनीत राणा आणि संजय राऊतांमध्ये सुरु झालाय.

Special Report | शिवसैनिकांच्या हल्ल्याची राज्यपालांकडे तक्रार!-TV9
Special Report | राजकीय आरोपांनी ‘जखम’ अजून चिघळणार का?-TV9