Special Report | भाजप महिलांच्या टार्गेटवर सेनेच्या दिपाली सय्यद?-TV9

| Updated on: Jun 01, 2022 | 8:52 PM

पंतप्रधान मोदींविरोधात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं, दिव्या ढोलेंनी पोलिसात तक्रार दिली...मात्र यानंतरच आपल्याला व्हॉट्सअॅपवर अश्लिल फोटो मॉर्फ व्हायरल करण्याची धमकी येत असल्याचा आरोप दिव्या ढोलेंनी केलाय.

दिपाली सय्यद आणि उमा खापरे आणि आता भाजपच्या दिव्या ढोले. पंतप्रधान मोदींविरोधात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं, दिव्या ढोलेंनी पोलिसात तक्रार दिली…मात्र यानंतरच आपल्याला व्हॉट्सअॅपवर अश्लिल फोटो मॉर्फ व्हायरल करण्याची धमकी येत असल्याचा आरोप दिव्या ढोलेंनी केलाय.  दिव्या ढोलेंनी मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये 28 मे रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र अजूनही दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही ?, असा सवालही ढोलेंनी विचारलाय.  दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्या ढोलेंची आहे…तर दिपाली सय्यद यांनीही तेच ओशिवारा पोलिस स्टेशन गाठलं. आणि त्यांनी भाजपच्या उमा खापरेंविरोधात तक्रार दाखल केली. दिपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढू असा इशारा उमा खापरेंनी दिला होता. त्यानंतर सय्यद यांनी पोलीस धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. किरीट सोमय्यांनी आधी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर सय्यद यांनी तेच शब्द पंतप्रधान मोदींसाठी वापरले. आणि आता वाद एवढा टोकाला पोहोचला की, शिवसेना-भाजपच्या महिला नेत्या आमनेसामने आल्यात.

Published on: Jun 01, 2022 08:52 PM
Special Report | अनिल देशमुख, नवाब मलिकांचं मत सेनेसाठी निर्णायक?-TV9
Special Report | सचिन वाझे माफीचा साक्षीदार, देशमुखांसह कोण गोत्यात?-TV9