राज्यात कवडीमोल मात्र तेलंगणात चार पट भाव; कांद्याचे ट्रकच्या ट्रक चालले; शेतकरी म्हणतात, ‘राज्य सरकार’
राज्यातील कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आनणारे दृष्य सध्या औरंगाबादसह कांदा उत्पादक जिल्ह्यात पहायला मिळत आहे. येथील कांद्याचे भाव कमालीचे पडले आहेत. राज्यात कांद्याला कवडीचेही भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
औरंगाबाद : आशिया खंडात सगळ्यात मोठी कांद्याची बाजार पेठ म्हणून महाराष्ट्राकडे आणि पर्यायाने लालसगाव कृषी उत्पन्न समितीकडे पाहिलं जातं. येथे कांदा उत्पादक शेतकरी वर्षानो वर्षे त्यांचा कांदा विक्रीसाठी आनतात. पण आता हाच कांदा लालसगावला न जाता थेट तेलंगणाला जातोय. तेलंगणातील हैदराबादमधील बाजारपेठेत उतरला जात आहे.
राज्यातील कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आनणारे दृष्य सध्या औरंगाबादसह कांदा उत्पादक जिल्ह्यात पहायला मिळत आहे. येथील कांद्याचे भाव कमालीचे पडले आहेत. राज्यात कांद्याला कवडीचेही भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मात्र त्यांना आधार देण्याचं काम बीआरएसच्या माध्यमातून तेलंगणात होत आहे.
येथे महाराष्ट्रात ज्या कांद्याला 400 500 ते 700 रुपयांचा भाव मिळत होता. त्याच कांद्याला तेलंगणामध्ये 1900 रुपयाचा भाव मिळत आहे. यावरूनच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी 1 रूपयात काय तेलंगणा सरकार विमा देतो का असा सवाल केला आहे. सध्या यावरून राज्यात राजकारण तापलेलं असताना मात्र शेतकऱ्यांना तेलंगणात चार पट भाव मिळतोय हे मात्र नक्की. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट