Special Report | शरद पवार यांच्यावर नेमका ST कर्मचाऱ्यांचा संताप का?

| Updated on: Apr 08, 2022 | 11:30 PM

मागील पाच महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज वेगळं वळण मिळालं. जवळपास 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आंदोलन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मागील पाच महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज वेगळं वळण मिळालं. जवळपास 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आंदोलन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडफेकही झाली. या प्रकारामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कारवाईचा इशारा दिलाय. त्यानंतर मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेृत्वात संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आलीय. मात्र, शरद पवार यांच्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांचा एवढा संताप का? असा सवाल विचारला जात आहे.

Special Report : पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे कर्मचाऱ्यांचा रोष की वेगळं षडयंत्र?
आमच्या जीवाला धोका, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप