Special Report | खडसेंना उमेदवारी मिळाली, जिंकून येणार?-tv9
राष्ट्रवादीच्या खडसेंनाही पराभूत करु असं दानवे म्हणालेच आहेत...त्यातच आता राष्ट्रवादी म्हणजेच अप्रत्यक्ष खडसेंना कोर्टाकडूनही झटका बसला. कारण मुंबई हायकोर्टानं जेलमध्ये असलेले राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला.
राष्ट्रवादीच्या खडसेंनाही पराभूत करु असं दानवे म्हणालेच आहेत…त्यातच आता राष्ट्रवादी म्हणजेच अप्रत्यक्ष खडसेंना कोर्टाकडूनही झटका बसला. कारण मुंबई हायकोर्टानं जेलमध्ये असलेले राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला. त्यामुळं खडसेंना मिळणारी मलिक आणि देशमुखांची 2 मतं कमी झालीत. तसंच मतांचा अधिकार नाकारल्यानं समीकरणही बदलणार आहे. सेनेचे आमदार रमेश लटकेंचं निधन झालंय. देशमुख आणि मलिकांना मतदानापासून वंचित करण्यात आलं. तर बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर परदेशात आहेत. त्यामुळं ते मतदान करणार नसल्याचं कळतंय. त्यामुळं मतांचा कोटा 26 वर आलाय. दोन्ही आमदार राष्ट्रवादीचेच असल्यानं पक्षाला मोठा फटका बसू शकतो. गरज पडल्यास रामराजेंच्या मतांचा कोटा शरद पवार ऐनवेळी वाढवू शकतात. रामराजेंसाठी मतांचा कोटा वाढवला तर खडसेंची डोकेदुखी वाढणार. भाजप देखील खडसे यांना पाडण्यासाठी सज्ज झालीय.