Special Report | शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं कोणाकडे जाणार?-tv9

| Updated on: Jul 25, 2022 | 9:01 PM

उद्धव ठाकरेंनीही जाहीरपणे पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र मागितलंय.  उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर, नाशिकमधल्या 36 नगरसेवकांनी तसंच पुणे, मालेगावातल्या पदाधिकाऱ्यांनीही मातोश्रीवर येऊन ठाकरेंसोबतच असल्याचं शपथपत्र दिलं.

शिवसेना आमची की तुमची ?, असा उद्धव ठाकरे आणि शिंदेंमधला वाद निवडणूक आयोगात पोहोचलाय. मात्र शिवसेनेनं आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 8 ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे आणि शिंदेंना पदाधिकाऱ्यांची कागदपत्र सोपवायची आहेत. पण शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळं आमदारांच्या अपात्रतेची याचिका निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आलीय. उद्धव ठाकरे – शिंदे गटाकडील आमदार, खासदार…आणि पदाधिकाऱ्यांची संख्या, याआधारे निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे…त्यामुळंच उद्धव ठाकरेंनीही जाहीरपणे पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र मागितलंय.  उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर, नाशिकमधल्या 36 नगरसेवकांनी तसंच पुणे, मालेगावातल्या पदाधिकाऱ्यांनीही मातोश्रीवर येऊन ठाकरेंसोबतच असल्याचं शपथपत्र दिलं.

Special Report | ये अजित दादा का स्टाईल है…! सरकारला धरलं धारेवर
Special Report | दिल्लीत भेटीगाठी…गल्लीत चर्चा-tv9