Special Report | Nitin Gadkari यांच्यासाठी मविआ कौतुकाचा ‘पूल’ का बांधत आहे? -tv9
सर्वच नेते गडकरींच्या कामाची तोंडभरुन स्तुती करतायत. पुण्यात वसंतदादा साखर कारखाना इन्स्टिट्यूटच्या साखर परिषदेत सर्वपक्षीय नेते एकत्र होते. पवार, गडकरी, थोरांतापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.
आजचं निमित्त पुण्यातल्या साखर परिषदेचं होतं., मात्र महिन्याभरापासून सर्वच पक्ष नितीन गडकरींसाठी कौतुकाचे पूल बांधतायत. शरद पवारांपासून फडणवीसांपर्यंत आणि संजय राऊतांपासून ते राजू शेट्टींपर्यंत.. सर्वच नेते गडकरींच्या कामाची तोंडभरुन स्तुती करतायत. पुण्यात वसंतदादा साखर कारखाना इन्स्टिट्यूटच्या साखर परिषदेत सर्वपक्षीय नेते एकत्र होते. पवार, गडकरी, थोरांतापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या साखर परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दरवर्षी आवर्जून राजकीय साखरपेरणी होते. जेव्हा गडकरींच्या कौतुकाचा विषय येतो., तेव्हा सर्वपक्षीय नेते हात न आखडता तोंडभरुन कौतुक करतात. आणि कधी-कधी गडकरींच्या कौतुकाआडून भाजपवर अप्रत्यक्ष निशाणाही साधतात. कोरोनाच्या काळात प्रत्येक खात्याच्या बजेटला कात्री लागली होती., मात्र त्या काळातली जर गडकरींची भाषणं काढून ऐकली., तर देशाच्या एकूज बजेटपेक्षाही गडकरींच्या खात्याचं बजेट जास्त आहे का, असा प्रश्न पडू लागतो..गडकरी प्रत्येक भाषणात मोठ-मोठ्या प्रकल्पांची घोषणा करतात., आणि अनेक प्रकल्पांना मंजुरीही देऊन टाकतात.