Special Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9

| Updated on: May 18, 2022 | 9:16 PM

बृजभूषण सिंहांना आता केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी याचंही समर्थन मिळालंय. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन, चूक केली त्यावर राज ठाकरेंनी स्पष्टता करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान यांनी केलीय.

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, त्याशिवाय अयोध्येत जाऊ देणार नाही, असा पवित्रा भाजपचे खासदार बृजभूषण सिंहांनी घेतला. त्यांनी आपल्या मोहिमेला समर्थन मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशाच्या बाहेरही सभा घेण्यास सुरुवात केलीय. दिल्लीतून बृजभूषण सिहांनी राज ठाकरेंना पुन्हा इशारा दिलाय. बृजभूषण सिंहांना आता केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी याचंही समर्थन मिळालंय. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन, चूक केली त्यावर राज ठाकरेंनी स्पष्टता करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान यांनी केलीय. तर उत्तर प्रदेशातलेच खासदार मनोज तिवारींनीही राज ठाकरेंकडे माफीची मागणी केलीय.

तर शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावरुन डिवचलंय. भाजपचे खासदार बृजभूषण सिंहाचा विरोध पाहता, आदित्य ठाकरेंचा हात पकडून राज ठाकरेंनी अयोध्येला जावं, अशी बोचरी टीका दिपाली सय्यद यांनी केलीय.  राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी बृजभूषण सिंह कोणतीही कसर सोडत नाहीय. त्यातच आता शिवसेनेकडूनही डिवचण्यास सुरुवात केलीय.

Published on: May 18, 2022 09:16 PM
Special Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर !-tv9
Sambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम