Special Report | संभाजीराजेंच्या खासदारकीचं काय होणार?-TV9
राज्यसभेच्या 6 व्या जागेवरुन छत्रपती संभाजीराजेंचं काय होणार ?, याचा सस्पेस कायम आहे... 31 मे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे...पण महाविकास आघाडी संभाजीराजेंना मदत करणार का ?, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. शिवसेनेनं मदत करावी म्हणून संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली.
राज्यसभेच्या 6 व्या जागेवरुन छत्रपती संभाजीराजेंचं काय होणार ?, याचा सस्पेस कायम आहे…
31 मे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे…पण महाविकास आघाडी संभाजीराजेंना मदत करणार का ?, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. शिवसेनेनं मदत करावी म्हणून संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. शिवसेनेत प्रवेश केला तर उमेदवारी देऊ असं उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना सांगितल्याची माहिती आहे. तर संभाजी राजेंनी अपक्षच लढावं, अशी अट भाजपचीही असल्याचं कळतंय. शिवसेनेकडून संजय राऊतांना उमेदवारी जाहीर झालीय…मात्र 6 व्या जागेवरुन महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेनं दावा केलाय…हीच जागा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून द्यावी, असं संभाजीराजेंची मागणी आहे..मात्र पक्षप्रवेश केला तरच उमेदवारी देऊ, अशी शिवसेनेची भूमिका आहे. 6 व्या जागेवरुन अपक्ष म्हणून मला सर्व पक्षीयांनी मदत करावी, अशी विनंती संभाजीराजेंनी केलीय..
राज्यसभेच्या सहाही जागांचं गणित पाहिलं तर शिवसेनेचे तसे 56 आमदार होते, पण रमेश लटकेंचं निधन झाल्यानं शिवसेनेचा आकडा 55 इतका आहे. राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 44 आमदार. इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 आमदार असं एकूण महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ आहे. तर भाजपकडे अपक्षांसह 113 आमदार आहेत. म्हणजेच महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांची संख्या पाहता, राज्यसभेची शिवसेनेला एक जागा राष्ट्रवादीला एक जागा काँग्रेसला एक जागा आणि भाजपचे 2 सदस्य निवडून जाऊ शकतात आणि 6 वी जी जागा आहे..त्याची मतं महाविकास आघाडी आणि भाजपकडे आहे…5 जण आरामात निवडून जाऊ शकतात आणि त्यानंतर उर्वरित मतांचा विचार केला तर शिवसेनेकडे 13 मतं, राष्ट्रवादी 12 मतं, काँग्रेस 2 मतं ,इतर आणि अपत्र 16 मतं. अशी एकूण 43 मतं होतात. म्हणजे संभाजीराजे सहज निवडून येऊ शकतात.
मात्र शिवसेना संभाजीराजेंच्या पक्षप्रवेशावर अडून बसलीय..तर शिवसेनेनं संभाजीराजेंना अपक्ष म्हणून मदत करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे. 2 उमेदवार निवडून आल्यानंतर, भाजपकडे 29 मतं राहतात. त्यामुळं भाजपही तिसरा उमेदवार देऊन खेळी करु शकते. मात्र हा निर्णय नेतृत्वं घेईल असं फडणवीस म्हणतायत..तर शिवसेनेनं 6 वी जागा का ?, हक्काची जागा द्यावी, असंही फडणवीसांनी म्हटलंय. शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे…तर संभाजीराजे शिवसेनेच प्रवेश करण्यास तयार नाही. त्यामुळं तूर्तास तरी सस्पेंस कायम आहे…