Special Report | संभाजी राजे शिवसेनेत प्रवेश करणार? हाती शिवबंधन बांधणार? सस्पेन्स वाढला -tv9
राज्यसभेची 6वी जागा शिवसेना उमेदवारच लढणार यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाम आहेत आणि त्यामुळेच संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर यावं असा निरोपच मुख्यमंत्री ठाकरेंनी राजेंना दिलाय.
छत्रपती संभाजीराजे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेत प्रवेश करणार?, मविआकडून उमेदवारी मिळवणार?, की मग अपक्षच लढणार?.याचा सस्पेन्स आता चांगलाच वाढलाय. कारण राज्यसभेची 6वी जागा शिवसेना उमेदवारच लढणार यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाम आहेत आणि त्यामुळेच संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर यावं असा निरोपच मुख्यमंत्री ठाकरेंनी राजेंना दिलाय. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी शिवसेनेच्या शिष्ठमंडळानं मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संभाजीराजेंची भेट घेतली.. यामध्ये खासदान अनिल देसाई, मंत्री उदय सामंत आणि शिवसेना सचिव मलिंद नार्वेकर सामिल होते. इतकच नाही तर शिवसेना नेते संजय राऊतांनी देखील फोनवरून संभाजीराजेंबरोबर शिवसेना प्रवेशाच्या ऑफरवर चर्चा केली.
Published on: May 22, 2022 10:28 PM