Special Report | शिवसेना आमदार संजय राठोडांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडणार?
विदर्भात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. बंजारा समाजात राठोड यांचं मोठं प्रस्थ आहे. त्यामुळं राठोड यांच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकबद्दल शिवसेना काय निर्णय घेणार हेच बघावं लागेल.
बंजारा समाजाचे नेते आणि माजी वनमंत्री एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीनचिट दिलीय. पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता राठोड यांचा त्या आत्महत्येशी काहीही संबंध नसल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी दिलाय. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑड़िओ क्लिपमधला आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
पण राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज आक्रमक झाला होता. राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी पोहरादेवीच्या महंतांनी केली होती. आंदोलनाचाही इशारा दिला होता. पुण्यातल्या तरुणीच्या आत्महत्येनंतर 14 महिन्यांनी पोलिसांचा अहवाल आलाय. आणि या अहवालात राठोड यांना क्लीनचिट मिळालीय. विदर्भात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. बंजारा समाजात राठोड यांचं मोठं प्रस्थ आहे. त्यामुळं राठोड यांच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकबद्दल शिवसेना काय निर्णय घेणार हेच बघावं लागेल.