Special Report | ‘गणेश नाईक माझ्या मुलाचे वडील’, महिलेची नाईकांविरोधात पोलिसांत तक्रार

| Updated on: Apr 14, 2022 | 11:29 PM

भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावरही लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आलाय. 1993 पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचं आमिष देत, तसंच जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.

भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावरही लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आलाय. 1993 पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचं आमिष देत, तसंच जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाने आपल्या ट्विटर हँडलवरुन दिलीय. त्यामुळे नबी मुंबईतील भाजपचे सर्वात मोठे नेते गणेश नाईक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

राज्य महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ‘नवी मुंबईतील एका महिलेनं ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात केलेला तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला प्राप्त झालाय. त्यात पीडित महिलेनं अशी तक्रार केली आहे की, गणेश नाईक यांच्यासोबत पीडिता 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. या संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा आहे. या महिलेनं त्यांचे वैवाहिक अधिकार तसंच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी या महिलेला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली’.

Special Report | आधी राज ठाकरे आता देवेंद्र फडणवीस… टार्गेट शरद पवार
Special Report | वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार?