Special Report | Raj Thackeray यांचे मुद्दे, योगींची कारवाई!-TV9

| Updated on: Apr 29, 2022 | 9:10 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी, ठाकरे सरकारला घेरत, सर्वात आधी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला. त्यानुसार 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचा राज ठाकरेंचा अल्टिमेटम आहे.  मात्र जे राज ठाकरे महाराष्ट्रात बोलत आहेत. आणि जी राज ठाकरेंची मागणी आहे. तशी कारवाई थेट उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ करतायत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी, ठाकरे सरकारला घेरत, सर्वात आधी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला. त्यानुसार 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचा राज ठाकरेंचा अल्टिमेटम आहे.
मात्र जे राज ठाकरे महाराष्ट्रात बोलत आहेत. आणि जी राज ठाकरेंची मागणी आहे. तशी कारवाई थेट उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ करतायत.  उत्तर प्रदेशमधील 11 हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत. तर 35 हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आलीय. हे झालं, भोंग्यांचं…आता मदरशांबद्दल पाहा…राज ठाकरेंनी मोदींकडेच मदरशांवर छापे टाकण्याची मागणी केली होती. राज ठाकरे महाराष्ट्रात मदरशांबद्दल बोलले, योगींनी तिकडे उत्तर प्रदेशात मदरशांकडे मोर्चा वळवला. योगींनी 7 हजार 442 मदरशांच्या चौकशीचे आदेश दिलेत. यूपी सरकारच्या आधुनिकीकरण योजनेची तपासणी होणार. फक्त कागदावर नोंद करुन सरकारी पैसे घेणारे मदरसे चौकशीच्या घेऱ्यात आलेत. समाजवादी पार्टीची मदरसा नीतीच योगींनी रद्द केलीयय. 558 मदरशांना 866 कोटींचं अनुदान मिळतं ते बंद होणार आहेत.

Special Report | भाजप-मनसे युतीची शक्यता का?-TV9
Kishori Pednekar | भैय्या हटाओ बोलणारे आता योगींची स्तुती करत आहेत : किशोरी पेडणेकर