Special Report | Raj Thackeray यांना धमकी देणारे योगींचे बृजभूषण! -TV9
उत्तर प्रदेशातून राज ठाकरेंना आव्हान देणारे एकमेव खासदार, ब्रृजभूषण शरण सिंह. 2008 मध्ये राज ठाकरेंच्या एका इशाऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या नाकात दम केला होता...विद्यार्थी, कामगार, एवढंच काय भाजी विक्रेत्य़ांनाही मारहाण केली...तोच राग, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं ब्रृजभूषण यांच्या मनात उफाळून आलाय...
उत्तर प्रदेशातून राज ठाकरेंना आव्हान देणारे एकमेव खासदार, ब्रृजभूषण शरण सिंह. 2008 मध्ये राज ठाकरेंच्या एका इशाऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या नाकात दम केला होता…विद्यार्थी, कामगार, एवढंच काय भाजी विक्रेत्य़ांनाही मारहाण केली…तोच राग, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं ब्रृजभूषण यांच्या मनात उफाळून आलाय…ब्रृजभूषण हे उत्तर प्रदेशातल्या गोंडा मतदारसंघातून खासदार आहेत
ते स्वतःला रामाचे वंशज मानतात…5 वेळा ते खासदार झालेत आणि यूपीत त्यांची बाहुबली अशी ओळख आहे. स्वतः पैलवान आहेत…आणि सध्या भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्षही आहेत. दबंगगिरीनं ते कायम चर्चेत राहतात, एकदा मंचावरच त्यांनी एका पैलवानाच्या कानशिलात लावली होती बृजभूषण यांच्या मित्रावर हल्ला झाला, त्याचा बदला म्हणून बृजभूषण यांनी हत्या करणाऱ्यालाच ठार केलं, आणि हे ते ऑनरेकॉर्ड कॅमेऱ्यावर बोलतात.
हत्या, टाडासारखे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. बाबरी मशीद पाडण्याच्या आरोपात अडवाणींसह ज्या ४० लोकांवर गुन्हे होते, त्यापैकी बृजभूषण सिंह एक आहेत. म्हणून अयोध्येतला हिंदू समाज आणि महंतांवर बृजभूषण सिंहांचा प्रभाव आहे. 1996 मध्ये बृजभूषण तुरुंगात असताना त्यांना थेट तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी पत्र लिहिलं होतं. 1957 मध्ये यूपीच्या बलरामपूरमधून वाजपेयी पहिल्यांदा लोकसभा जिंकले….मात्र त्यानंतर इथं प्रत्येकवेळी भाजपचा पराभव झाला…मात्र वाजपेयींनंतर बलरामपूरमधून भाजपच्या चिन्हावर लाखांच्या फरकानं जिंकणारे एकमेव व्यक्ती म्हणजे बृजभूषण सिंह आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि मनसेची जवळीक वाढलीय…आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप-मनसेची युती होईल की काय ?, यावरुन चर्चा सुरु आहे..
त्यातच भाजपच्याच खासदारानं राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा उघडला..मात्र राज ठाकरेंना विरोध भाजपचा विषय नसून आपलं वैयक्तिक आंदोलन असल्याचं ब्रृजभूषण म्हणतायत.. 2008 मध्ये राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा हाती घेत, उत्तर भारतीयांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती…अर्थात या भूमिकेमागं मुंबई आणि महाराष्ट्रात आधी मराठी तरुणांना रोजगार हा विषय होता. एवढंच नाही तर मुंबईत उत्तर भारतीयांच्या पंचायतमध्येही त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडलीय. ब्रृजभूषण स्वत: उत्तर प्रदेशातलेच आहेत..राज ठाकरेची जुनी आंदोलन उत्तर भारतीयांविरोधातलीच आहेत. आता भाजप-मनसेची जवळीक पाहता, ब्रृजभूषण यांचं आंदोलन थांबवून अयोध्येसाठी राज ठाकरेंचा मार्ग मोकळा करण्यासाठी नेतृत्वाकडूनही हालचाली सुरु झाल्यात.