Spice jet emergency landing: स्पाईस जेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग; उड्डाणावेळी इंजिनमध्ये लागली आग
उड्डाणाच्यावेळी इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने स्पाईस जेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Spice jet emergency landing) करावे लागले. ही घटना पाटणा (patna) येथे घडली. विमानाच्या डाव्या पंखाला आग लागल्याने स्पाइसजेटच्या विमानाला पाटणा येथील बिहता एअरफोर्स स्टेशनवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे बोईंग 727 विमान होते. विमानाच्या […]
उड्डाणाच्यावेळी इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने स्पाईस जेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Spice jet emergency landing) करावे लागले. ही घटना पाटणा (patna) येथे घडली. विमानाच्या डाव्या पंखाला आग लागल्याने स्पाइसजेटच्या विमानाला पाटणा येथील बिहता एअरफोर्स स्टेशनवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे बोईंग 727 विमान होते. विमानाच्या डाव्या पंखात ज्वाळा दिसत होत्या. त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाचे दोन ब्लेड वाकले होते. फुलवारी शरीफच्या लोकांनी ज्वाला पाहिल्या आणि विमानतळ अधिकाऱ्यांना सावध केले, असे पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंग यांनी सांगितले. आग लागण्याचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.