VIDEO : धक्कादायक प्रकार! गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी प्रतिष्ठीत रूग्णालयावर छापेमारी
गेल्या 6 महिन्यांच्या आधीच जिल्ह्यातील राधानगरी तालुकातील कसबा वाळवे व भुदरगड तालुक्यात मडिलगे खुर्द येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी प्रकरणी छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी तेथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करताना बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले होते. तर याप्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती.
कोल्हापूर : गर्भलिंग चाचणी करणे हे बेकायदेशीर असून देखील कोल्हापुरातील याबाबत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. गेल्या 6 महिन्यांच्या आधीच जिल्ह्यातील राधानगरी तालुकातील कसबा वाळवे व भुदरगड तालुक्यात मडिलगे खुर्द येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी प्रकरणी छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी तेथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करताना बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले होते. तर याप्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूर शहरातीलच एका रूग्णालयावर शासकीय अधिकाऱ्यांनी छापा मारला. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरातील राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर आज छापेमारी करण्यात आली. यात हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन बंद दाखवून गर्भलिंगनिदान केले जात होते हे स्पष्ट झालं आहे. तर गर्भलिंग निदानसाठी हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यास 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.