‘जोतिबाच्या नावाने चांगभल’; जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल
दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस असल्याने दर्शनाला जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी दिसत आहे
कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावाने चांगभल’चा अखंड गजर करत महाराष्ट्राचे कुलदैवत श्री जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रेला आज बुधवारी सुरूवात झाली. येथील वाडी रत्नागिरीमध्ये मोठ्या उत्साहात लाखो भाविक महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येत आहेत. दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस असल्याने दर्शनाला जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी दिसत आहे. तर गुलाल खोबऱ्याची उधळण भाविकांकडून केली जात असून मनाच्या सासनकाट्या मंदिरा आवारात यायला सुरुवात झाली आहे. यावेळी मंदिराचा परिसर केलेल्या गुलाल उधळणीने मंदिर आणि मंदिर परिसर गुलालाने नाहून निघाला आहे.
Published on: Apr 05, 2023 08:55 AM