रत्नागिरीत सकाळपासून पावसाला सुरुवात; आंब्याला अवकाळीचा फटका
रत्नागिरी जिल्हयात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पवासामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील आंब्याला या पावासाचा फटका बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र या पवासामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. या अवकाळी पावसाचा शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णता काही प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे.