Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स भरत गोगावले यांनी संपवला! केलं मोठं वक्तव्य; पालकमंत्री पदावरही केलं भाष्य

| Updated on: May 22, 2023 | 4:25 PM

उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एका कार्याक्रमात रायगड जिल्ह्याचे आपण तात्पुरते पालकमंत्री आहोत असे सांगत अनेकांना धक्का दिला. तसेच त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री हे मंत्रिमंडळ विस्तारनंतर भरत गोगावले असतील असे म्हटलं होतं.

रायगड : राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असे म्हटलं जात आहे. याचदरम्यान उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एका कार्याक्रमात रायगड जिल्ह्याचे आपण तात्पुरते पालकमंत्री आहोत असे सांगत अनेकांना धक्का दिला. तसेच त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री हे मंत्रिमंडळ विस्तारनंतर भरत गोगावले असतील असे म्हटलं होतं. त्यावर आता गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या आठ ते दहा दिवसात मंत्री मंडळ विस्तार होईल अशी अशा आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर पालकमंत्री पदावर बोलताना, आली संधी तर गोंधळ घालणारच असे ते म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे हे अडचणीत दिसले तेंव्हा आम्ही थोडे पाठीमागे थांबलो. पण आता संधी मिळाली तर सोडणार नाही. तर सामंत यांच्याकडे दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद हे त्यांना द्यावच लागेल असेही गोगावले म्हणाले.

Published on: May 22, 2023 04:25 PM
‘लिहून घ्या सोमवार आहे. शंकराचा वार आहे’, शिवसेना नेत्यानं असं म्हणत कोणावर केला पलटवार?
खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, माझ्याकडे वाईट नजरेने बघणारा तो पुरुष…