मोठी बातमी! मणिपूर घटनेवरून राज्य महिला आयोगाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली सर्वच स्तरावरून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे.
पुणे, 22 जुलै 2023 | मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली सर्वच स्तरावरून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे. त्या म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय, माणूसकीला काळीमा फासणार आहे. या घटनेची दखल घ्यावी यासाठी मी राज्य महिला आयोगाची अध्यक्षाच्या नात्याने मी निश्चितपणे राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्र व्यवहार करेन. राष्ट्रीय मानवाधिकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्यावतीने मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सूचना देत कारवाई करावी. अशा प्रकारच्या घटना कुठे घडू नये.महिलांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महिला आयोगाने कडक पवालं उचलावी.”