तातडीच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुचना, मात्र अजित पवार म्हणतात…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून सभागृहात सरकारचे निवेदन सादर केलं आहे. याचदरम्यान आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. तर बचावकार्यावर नजर ठेवून आहेत.
रायगड, 20 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने राज्यात दुखाचे वातावरण आहे. यावरून पावसाळी अधिवेशानात देखील जोरदार चर्चा झाल्याची पहायला मिळत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून सभागृहात सरकारचे निवेदन सादर केलं आहे. याचदरम्यान आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. तर बचावकार्यावर नजर ठेवून आहेत. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर आता बचावकार्यासाठी NDRF ची 2 पथके घटनास्थळी दाखल झाली असून आणखी 2 पथके रवाना झाली आहेत. तर दुरदैवी बाब म्हणजे या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून सुमारे 75 जणांना वाचवण्यात यश आल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. तर सततच्या पाऊस आणि रस्ता नसल्याने बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात यावा असा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मात्र इर्शाळवाडीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर येथे पाऊस आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येऊ शकत नाही अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते मंत्रालयात आपत्कालिन नियंत्रण कक्षात या घटनेवर लक्ष ठेवून असून त्याबद्दल माहिती घेत आहेत.