‘अमोल मिटकरी म्हणजे राष्ट्रवादी हाय का?’ शिंदे गटातील नेत्याचा खरमरीत सवाल
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्विट जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. या ट्विटवरून सध्या शिंदे गटातील नेत्यांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे. मिटकरी यांनी, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व असं ट्विट केलं होतं.
ठाणे, 23 जुलै 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्विट जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. या ट्विटवरून सध्या शिंदे गटातील नेत्यांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे. मिटकरी यांनी, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता मिटकरी यांच्यावर टीका होत आहे. यावरूनच राज्य उत्पाद शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी, अमोल मिटकरी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे असा टोला लगावला आहे. तर तसं ट्विट हे मिटकरी यांची व्यक्तिगत इच्छा असेल, जी त्यांनी बोलावून दाखवली. भाजप आणि शिवसेना समन्वय समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शामिल करुन घेतले आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याने महायुतीत काहीही होणार नाही. महायुती भक्कम असल्याचंही देसाई यांनी म्हटलं आहे.