‘स्वतच्या घरात वाकून बघा’; शंभुराज देसाई यांची आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका
आदित्य ठाकरे यांना आता संजय राऊत यांची सवल लागल्याची घणाघाती टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी केली आहे
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली होती. तसेच शिंदे गटाचे काही आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचे सांगत ते ठाकरे गटात येण्यासाठी निरोप पाठवत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतली. त्यांनी, आदित्य ठाकरे यांना आता संजय राऊत यांची सवल लागल्याची घणाघाती टीका केली आहे. यावेळी शंभुराज देसाई यांनी, आम्ही त्यांच्या विधानाला महत्व देत नाही. तर तुमची मविआतील तुमची जागा कळाली का असा सवाल केला आहे. तर तुमच्यातला एक एक हिरा आता फूटत आमच्याकडे येत आहे. त्यामुळे आपल्या घरात पहा, ते न करता दुसऱ्याच्या घरात वाकून बघता. आमचा संसार सुखाचा चालला आहे. त्यामुळे आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून अशी राऊत यांची सवय आता आदित्य ठाकरे यांना लागली आहे.