अजित पवार यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी नेत्याची टीका; म्हणाला, ‘56 अजित पवार, शरद पवार म्हणजे फॅक्टरी’
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपने फूट पाडली तशीच राष्ट्रवादी पाडल्याची टीका केली जात आहे. तर अजित पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अशीच नाराजी नागपूरमधील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये दिसत आहे.
नागपूर : राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्याने एकच खलबळ उडालेली आहे. जशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपने फूट पाडली तशीच राष्ट्रवादी पाडल्याची टीका केली जात आहे. तर अजित पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अशीच नाराजी नागपूरमधील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये दिसत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले राजकीय भुकंपानंतर प्रतिक्रिया देताना आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. तर अजित पवार यांच्यावर टीका करताना, त्यांच्या जाण्याने किंवा त्यांच्याबरोबर जे गेलेत त्यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला 1 टक्का देखील फरक पडत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर 100 अजित पवार बनवणारी फॅक्टरी म्हणजे शरद पवार असल्यानं शरद पवार म्हणजेच पक्ष आणि शरद पवार त्यामुळे येथील नेते आणि कार्यकर्ते साहेबांसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर गद्दारांना आम्ही धडा शिकवणार असा इशारा द्खील त्यांनी दिला आहे. मात्र दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाल्याने विदर्भातील इतर पदाधिकाऱ्यांची वेड अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.