संपाचा फटका, नागपुरात 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
नागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला असून 18 लाख कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. यात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूर जिल्ह्यात मेयो आणि मेडिकलमधील 1500 च्यावर परिचारीका संपात सहभागी झाल्याने रुग्णालयातील शस्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या आहेत. तर रक्त तपासण्या, औषध वितरणावरंही या संपाचा परिणाम दिसत आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असून परिचर्या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना बोलावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Published on: Mar 15, 2023 08:53 AM