राज्यात तळीरामांची संख्या वाढली, राज्याच्या तिजोरीत टाकली इतक्या कोटिंची भर

| Updated on: May 10, 2023 | 9:35 AM

महाराष्ट्रामध्ये मद्यविक्री मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. राज्यात तब्बल 23 % वाढ झाल्याने शासनाच्या तिजोरीतही भर पडली आहे.

मुंबई : दारू मुळातच वाईट त्याचा नादी लागू नका असे अनेक वडिलधारे लोक बोलत असतात. याच्यामुळे अनेकांची संसारे उद्धवस्त झाली आहेत. तर याची दुकाने चालवणारे गडगंज झाले आहेत. याचा काहीसा फायदा हा कधी कधी सरकारला आणि सरकारी तिजोरिलाही होताना दिसतो. आताही महाराष्ट्रामध्ये मद्यविक्री मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. राज्यात तब्बल 23 % वाढ झाल्याने शासनाच्या तिजोरीतही भर पडली आहे. 21 हजार 550 कोटींचं उत्पन्न आलं आहे. नुकतीच ही आकडेवारी राज्य उत्पादक शुल्क विभागाने जाहीर केली आहे. बिअर आणि वाईन मध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. एका वर्षातील 23% वाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ म्हणून नोंदवली गेली आहे. सन 2021-22 आणि 2022-23 या वर्षांची तुलनात्मक आकडेवारी नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केली आहे. त्यात मद्य विक्रीतून राज्य शासनाला मोठा फायदा झाल्याचा देखील समोर आल आहे. उत्पादन शुल्क खात्याच्या नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील मद्यविक्री मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक विभागांच्या तुलनेत प्रचंड वाढली. छत्रपती संभाजीनगरात 29.7 टक्के, तर कोल्हापुरात 28.5 टक्क्यांनी उत्पन्न वाढले.

Published on: May 10, 2023 09:35 AM
Kerala Story Row : जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
मुंबईकरांनो तब्येत सांभाळा… तापमानात होणार ‘इतकी’ वाढ अन् अवकाळीचीही शक्यता