Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर राऊत यांचे जोरदार टीकास्र

| Updated on: Apr 21, 2023 | 11:11 AM

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना काय बोलले होते. सत्तेत आल्यास दोन दिवसांत आरक्षण देतो, असं म्हणाले होते. मग काय झालं आरक्षणाचं

मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे हा राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यादरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदारनिशाना साधताना, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना काय बोलले होते. सत्तेत आल्यास दोन दिवसांत आरक्षण देतो, असं म्हणाले होते. मग काय झालं आरक्षणाचं. तेंव्हा पासून आम्ही सर्वच जन न्यायालयात काय होतंय याची वाट पाहत होतो. इतर सर्व विषयातील निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात. मग महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा निकाल आपल्या मनासारखा का लागत नाही? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Published on: Apr 21, 2023 11:11 AM
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी, नाशिक जिल्ह्यात किती उमेदवार रिंगणात?
महिलांचं अनोखं ‘बाजा बजाओ आंदोलन’, कुठं एकवटले ग्रामस्थ?