कांद्याप्रकरणी राज्यातील मंत्री लाचार झालेत, खासदार अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

| Updated on: Dec 30, 2023 | 6:29 PM

शेतकरी आक्रोश मोर्च्याचा समारोप आज झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण करताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जरा कुठे कांद्याला भाव मिळायला लागले की शेतकऱ्यांच्या ताठात सरकारने माती कालवली असल्याचेही अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटले आहे.

पुणे | 30 डिसेंबर 2023 : अफझल खानाने तुळजाभवानी मंदिरावर घण घातला त्यावेळी त्याच्या सैन्यातील मराठा सरदार काही करू शकले नाहीत. कारण त्यांनी मांडलिकत्व पत्करलेले होते. तसेच राज्यातील सत्ताधारी मंत्री केंद्रातील सत्तेचे मांडलिकत्व पत्करलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय घेतलेले जात असतानाही ते मान खाली घालून बसले आहेत अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चात केली आहे. देशातील जनतेला कृषी मंत्र्याचे नाव देखील माहीती नाही. आज कृषीप्रधान देशाला कृषीमंत्री नाही. देशातील जनतेला कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांची आठवण येते, याचा अर्थ पवार यांच्या कामाचा ठसा नऊ वर्षांनंतरही पॉवरफूल सरकारला ठसा पुसता आलेला नाही असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Published on: Dec 30, 2023 06:25 PM
तंबूत राहणाऱ्या रामलल्लाला पक्कं घर मिळालं, 4 कोटी गरीबांनाही पक्कं घर मिळालं, मोदींनी विकासाचं मॉडेल मांडलं
2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, संजय राऊत यांचा दावा