भिडे यांच्या पाठिशी भाजप, पटोले यांच्या या आरोपावर बावनकुळे यांचा पलटवार; म्हणाले, ‘अभ्यास करून…’
काँग्रेसकडून भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलनं केली जात आहेत. तर यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिंडे यांना फाशी देणार का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
मुंबई, 30 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान करून राज्यात नवा वाद निर्माण केला आहे. त्यावरून काँग्रेसकडून भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलनं केली जात आहेत. तर यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिंडे यांना फाशी देणार का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. तर भिडेंच्या मागे भाजप आहे का हेही स्पष्ट करावं असं म्हणाले होते. त्यावरून आता भाजपनं उत्तर दिले आहे. यावर सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलं आहे, बघा व्हिडीओ…
Published on: Jul 30, 2023 10:32 AM