राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात गळती; शिंदे गटाचा दे धक्का, अनेक नेत्यांनी केलं राम राम
आगामी लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे पहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र यादरम्यान त्यांच्या प्रयत्नांवर पाणी शिंदे गटाने फेरलं आहे.
सोलापूर : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे पहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र यादरम्यान त्यांच्या प्रयत्नांवर पाणी शिंदे गटाने फेरलं आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली असून अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीला शिंदे गटाने दे धक्का दिल्याचे बोलले जात आहे. कारण अजित पवार व जयंत पाटील हे सोलापूर दौर्यावर जाण्याधीच त्यांच्या आगमणाची तयारी करणारेच ज्योतिबा गुंड आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.