लोकसभेचे पडघम वाजत असतानाच काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून मोठी अपडेट; पटोले यांनी काय दिले संकेत?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात मधल्या काळात पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजीचा सूर लावला होता. हे प्रकरण काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत गेलं होतं. तेव्हापासूनच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली होती.
मुंबई : मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार, मुंबईचे अध्यक्ष बदलणार अशी चर्चा रंगली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात मधल्या काळात पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजीचा सूर लावला होता. हे प्रकरण काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत गेलं होतं. तेव्हापासूनच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली होती. त्या प्रश्वावर नाना पटोल यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रश्नावर दोनच शब्दात उत्तर देताना मी विधानसभा, लोकसभापर्यंत अध्यक्ष म्हणून काम करणार असल्याचे म्हटलं आहे. तर सुरू असणाऱ्या कलहावर आता पडदा पडला आहे. तर काँग्रेसमध्ये आता वादाला कोणतंही स्थान राहिलेलं नाही. तर काँग्रेसमधील सर्व नेते एकत्र येत विधानसभा, लोकसभेच्या जागा कशा जिंकायच्या यावर आपला प्लॅन सुरू असल्याचंही ते म्हणाले.