Rupali Chakankar | Navneet Rana यांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी : रुपाली चाकणकर
नवनीत राणा यांना त्रास होत असेल तर राज्य महिला आयोगाकडे राणा यांनी तक्रार करावी. महागाई, बेरोजगारी आणि विविध प्रश्न असताना विरोधकांनी महाराष्ट्राला यातून सावरण्याची भूमिका घ्यावी. राणा यांच्याबाबतचे विषय महत्वाचे वाटत नाही, असे चाकणकर पुढे म्हणाल्या.
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी नवनीत राणांवर टिका केली आहे. महाराष्ट्रात कोरोना असताना केंद्र सरकारकडे महाराष्ट्रासाठी काय मदत मागितली? असा सवाल त्यांनी नवनीत राणा यांना केला आहे. शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे विकृत मनोवृत्तीचं लक्षणं आहे. नवनीत राणा यांना त्रास होत असेल तर राज्य महिला आयोगाकडे राणा यांनी तक्रार करावी. महागाई, बेरोजगारी आणि विविध प्रश्न असताना विरोधकांनी महाराष्ट्राला यातून सावरण्याची भूमिका घ्यावी. राणा यांच्याबाबतचे विषय महत्वाचे वाटत नाही, असे चाकणकर पुढे म्हणाल्या.
Published on: May 09, 2022 08:08 PM