जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल

| Updated on: Oct 26, 2024 | 3:11 PM

भाजपाचे नेते सुजय विखे- पाटील यांच्या कार्यक्रमात वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Follow us on

कॉंग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर भाजपाचे नेते सुजय विखे -पाटील यांचे कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. या वक्तव्यावरुन राजकारण तापले असतानाच आता या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात वसंतराव देशमुख यांच्या गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे. राज्य महिला आयोगाने स्थानिक अहिल्यानगर पोलिसांना पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तीवर कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र साधूसंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर अशी अश्लाघ्य भाषेतील टीका खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक स्रीचा सन्मान हा राखला गेलाच पाहीजे असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.