जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं , रोहित पाटील यांची टीका

| Updated on: Oct 26, 2024 | 4:07 PM

कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याकडून अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पाटील यांनी अशा प्रकारचे भाष्य करणाऱ्यांची संस्कृती काय आहे हे दिसून येते अशी टीका केली आहे.

सांगलीतून विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने स्वर्गीय आर.आऱ.पाटील यांचे पूत्र रोहित पाटील यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटातून संजयकाका पाटील हे उभे राहणार आहेत. यावर रोहीत पाटील यांनी शरद पवार यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच जनतेला माहिती आहे की खरे काम कोण करतं आणि कोण काम केल्याचा बनाव करते हे सर्व सुज्ञ जनतेला माहिती आहे. संगमनेर येथे काल झालेल्या सभेत सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर केलेली खालच्या पातळीवरील टीका याबद्दल रोहीत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले महिलांनी राजकारणात येऊ नये अशा पद्धतीने चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा हा प्रकार अतिशय किळसवाणा आहे. या राज्यातील माता-भगिनी या वक्तव्याचा नक्कीच विचार करेल आणि उत्तर देईल असेही रोहीत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Published on: Oct 26, 2024 04:06 PM
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल