लालबागच्या राजाच्या दर्शनाला तुफान गर्दी
मुंबईत २ वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या जल्लोषानं गणेशोत्सव होतोय. यंदाच्या सणाला कोणतेही निर्बंध नाहीयत. त्यात शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे लोकांची तोबा गर्दी होऊ लागलीय.
मुंबई : लालबागच्या राजाच्या(lalbaugcha raja) दर्शनाला तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईत २ वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या जल्लोषानं गणेशोत्सव होतोय. यंदाच्या सणाला कोणतेही निर्बंध नाहीयत. त्यात शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे लोकांची तोबा गर्दी होऊ लागलीय. काही दिवसांपूर्वी कृष्ण जन्माष्ठमीलाॉ बांके बिहारी मंदिरात अशीच गर्दी उसळली होती. ज्याचा परिणाम चेंगराचेंगरी होऊन काही लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला. अशा घटना टाळायच्या असतील. तर गणेश मंडळांनी दर्शन रांगा आणि गर्दीचं नियोजन अजून बारकाईनं हाताळायला हवं.
Published on: Sep 04, 2022 11:04 PM