परभणी पूर्णा तालुक्यात गारपीट, पहा काय झाले शेतकऱ्यांच्या पिकांचे
तालुक्यातील चुडावा, पिपंरण वडी, कावलगाव, धानोरा मोत्या, कावलगाव आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह काहीप्रमाणात गारपीट झाल्याचे समोर येत आहे.
परभणी : राज्यात याच्याआधीच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह (unseasonal rain) गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात (Purna Taluka) गारपीट झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाज आहे. तालुक्यातील चुडावा, पिपंरण वडी, कावलगाव, धानोरा मोत्या, कावलगाव आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह काहीप्रमाणात गारपीट (hailstones) झाल्याचे समोर येत आहे. पूर्णा तालुक्यात यापूर्वीही गारपीट झाली होती. तेंव्हाही शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे प्रमाणावर नुकसान झाले होते. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि गारपीट सुरू झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांवरची पत्रे ही उडाली. लागोपाठ दोन वेळा गारपीट आणि पावसामुळे आता मात्र शेतकरी मेटाकुटीला आला आहे.