वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?

| Updated on: Oct 26, 2024 | 5:12 PM

संगमनेर येथील सभेत भाजपा नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. या प्रकरणात पोलिस अधिक्षकांनी कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

संगमनेर येथील एका सभेत सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाजपाचे कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. या नंतर संगमनेर येथे विखे पाटील आणि थोरात यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला आहे. वाहनांना पेटविण्यात आले असून मोठी तोडफोड झाली आहे. या प्रकरणात जयश्री थोरात यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आचार संहितेचे उल्लंघन झाले असेल तर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे.

 

Published on: Oct 26, 2024 05:12 PM