शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक आक्रमक; निरागस बालकांसह पालकाचं आंदोलन, नेमक कारण काय?

| Updated on: Jun 15, 2023 | 1:28 PM

शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतल्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणालेत.

नाशिक : महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला आज पासून (15 जून) सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतल्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणालेत. मात्र दुसरीकडे नाशिकच्या भोसला स्कूलच्या शिशु विहार शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांवर आंदोलनाची वेळ आहे. येथे विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेली इमारत दिल्याने पालक आक्रमक झाले. तर यावेळी शाळेच्या बाहेरच ठिय्या पालकांनी केला. तसेच विद्यार्थ्यांच्या फीमध्ये इमारत शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांना नवी इमारत न दिल्याने पालकवर्ग संतप्त झाला. शाळा प्रशासनाने दिलेली इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याने नवी इमारत देण्याची मागणी पालकांची आहे. तर या शाळेचे सुरक्षा रक्षक आले असता त्यांना पालकांनी हुसकावून लावत जे योग्य निर्णय घेऊ शकतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करु असे सुनावले.

Published on: Jun 15, 2023 01:28 PM