HSC Board Exam | झालं गेलं विसरून जा! पुन्हा जिद्दीने तयारीला लागा, बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

| Updated on: May 29, 2023 | 11:43 AM

याचदरम्यान आता बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्त्वाची बातमी दिली आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै महिन्यातच परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. तर दहावीच्या परिक्षेचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. याचदरम्यान आता बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्त्वाची बातमी दिली आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै महिन्यातच परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा आता जुलैमध्येच घेण्यात येणार आहे. तर फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार आहे. जुलै-ऑगस्ट 2023 आणि फेब्रुवारी-मार्च 2024 या दोनच संधी उपलब्ध असतील. तसेच पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना परिक्षेला बसायचं आहे. त्यांनी घाई करा. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (29 मे) सुरू होणार आहे. तर 29 मे ते 9 जून पर्यंत नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर 10 जून ते 14 जूनपर्यंतच विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विद्यार्थ्याने त्याच्या शाळेशी संपर्क करावा…

Published on: May 29, 2023 11:43 AM
गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादानंतर संभाजीराजे छत्रपतींचा पाठिंबा; म्हणाले, “महिलांना स्वातंत्र्य…”
‘ये थांबरे, अगाऊपणा नको… अशा लोकांमुळे पार्टीचा सत्यानाश झालाय’, रामदास आठवले भर सभेत भडकले