Dasara Melava | मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जिल्हास्तरावर जय्यत तयारी, लवकरच बैठकांचे सत्र

| Updated on: Sep 18, 2022 | 2:46 PM

Dasara Melava | मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जिल्हास्तरावर जय्यत तयारी सुरु आहे.

Dasara Melava | मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिंदे गटाची (Shinde Group) जिल्हास्तरावर जय्यत तयारी सुरु आहे. जिल्हास्तरावर पक्षाने बैठकांचे सत्र सुरु केला आहे. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांनी मजबूत दावेदारी केलेली आहे. याप्रकरणी न्यायपालिकेचाही दरवाजा ठोठावण्यात आला आहे. पण अद्याप याविषयीचा निर्णय झालेला नाही. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर शिवाजी पार्कवर कोणालाा परवानगी द्यायची यावरुन दबाव आहे.

अशातच स्थानिक पातळीवर मात्र शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे. दसऱ्या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे या मुद्यावरुन शांतता दिसत असली तरी जिल्हास्तरावर शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे. भंडारा जिल्ह्याचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांनी याविषयीची माहिती दिली. कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक
Raj Thackeray – पालिका निवडणुकांसाठी बराच वेळ,त्याआधी कामाला लागा -राज ठाकरे