मंत्री छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; महंत सुधीरदास महाराज यांची मागणी

| Updated on: Aug 20, 2023 | 2:10 PM

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे राज्यात त्यांच्याविरोधात ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. तर आता त्यांच्याविरोधात टीका देखील होत आहे.

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना सरस्वती देवी आणि शारदा देवी बाबत विधान केलं होतं. यावर आता वाद निर्माण झाला असून, मंत्री छगन भुजबळ हे वारंवार हिंदू देवतांचा अपमान करत असल्याचे वक्तव्य महंत सुधीर दास महाराज यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना समज देण्याची मागणी सुधीर दास महाराज यांनी केलीय. इथून पुढे असे वक्तव्य झाल्यास मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी हे नाव ठेवत नाहीत असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं. त्यामुळे सध्या राज्यात नव्या वादास तोंड फुटलेलं आहे.

Published on: Aug 20, 2023 01:58 PM
‘कोण दिपाली सय्यद, कोणत्या पक्षात?’ मनसे नेत्याचा थेट सवाल?
सामनाच्या अग्रलेखाला तरूण भारतमधून उत्तर; आपले नालायकपण मान्य करायचे नसले की….