आता तरी त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल, दसरा मेळाव्याच्या निकालावरून मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला

| Updated on: Sep 24, 2022 | 1:03 PM

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. दसरा मेळाव्याचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला, यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधाला आहे.

मुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) जोरदार टोला लगावला आहे.  दसरा मेळाव्याचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला. उच्च न्यायालयाने (High Court) शिवसेनेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. यावरून आता सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. काही नेत्यांकडून कायमच न्यायालयाच्या भूमिकेवर संशय घेतला जातो. मात्र यावेळी निकाल त्यांच्या बाजुने लागला आहे. अपेक्षा करूयात की आता तरी त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार शिंदे गट की शिवसेना यावरून राज्याचं राजकारण तापलं होतं. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झालं आहे.

 

अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला शिवसेनेचा विरोध, उचललं महत्वाचं पाऊल
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन, युवासेना सज्ज, पाहा…