‘नाना पटोले यांनी आदर्श नागरिक बनावं’, भाजपच्या बड्या नेत्याचा सल्ला
भाजप जातीय तेढ निर्माण करत आहे', अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. "नाना पटोले भाजपने चांगले काम केलं आहे, असे म्हणतील का कधी?
भंडारा : ‘भाजप जातीय तेढ निर्माण करत आहे’, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.”नाना पटोले भाजपने चांगले काम केलं आहे, असे म्हणतील का कधी? त्यांचे कामचं आहे टीका करणे.कधी म्हणतात आरडीएक्स घेवून गेले. मात्र कधी आदर्श नागरीक बनण्याचा प्रयत्न नाना पटोले करीत नाही.तुमच्याकडे पुरावे आहेत तर पोलीसांना द्यायचं हे काम पटोले करत नाही. ना ना पटोले तुम्ही नागरीकशास्त्र शिकले नाही का? सातशे गुणांपैकी 25 गुण तरी मिळाले का? तुम्ही जर भारतीय आहात तर पोलीसांना माहीती दिली का?”, असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांना केला आहे.
Published on: May 21, 2023 11:34 AM