“उद्धव ठाकरे यांना आमदार सांभळता आले नाही, मग राजकारणात राहून काय करायचंय?”, भाजप नेत्याची टीका
ठाकरे-केजरीवाल भेटीवर वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हे सर्व शक्तीहीन नेते आहेत. देशात असा एक नेता नाही जो पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात मूठ बांधू शकेल. मोदीजींनी देशांचा विकास, गरिबांच्या सेवेसाठी योजना आणल्या.
नागपूर : ठाकरे-केजरीवाल भेटीवर वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे सर्व शक्तीहीन नेते आहेत. देशात असा एक नेता नाही जो पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात मूठ बांधू शकेल. मोदीजींनी देशांचा विकास, गरिबांच्या सेवेसाठी योजना आणल्या. काँग्रेसचं सरकार असताना अतिरेक्यांना या देशात पाहुणे आहोत असं वाटायचं. आता मोदीजींच्या सरकारमध्ये अतिरेक्यांना हजारदा विचार करावा लागतोय.अतिरेक्यांनी मोदी नाव ऐकले तरीही घाबरतात”, असे मुनगंटीवार म्हणाले.”केजरीवालांचा अपवाद सोडला, तर इतरांचं काय? बिहारची स्थिती काय? उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना कधी उत्तर दिलं का? खोटी आश्वासनं दिली. त्यांना पार्टीचे आमदार टिकवता येत नाही. यांना राजकारणात राहून काय करायचं आहे? ना जनतेचा विकास त्यांनी केला. 40 आमदार फुटतात काही तरी दोष असणार ना.उद्धव ठाकरे यांच्या स्वभावामुळे उरलेले आमदार ही जातील”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.