सुधीर मुनगंटीवारांना वन खातं, तर चंद्रकांत पाटलांना उच्च आणि तंत्रशिक्षण खातं

| Updated on: Aug 14, 2022 | 6:07 PM

चंद्रकांतदादा माजी प्रदेशाध्यक्ष होते. चार दिवसांपूर्वीच त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं. पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य हे खातं देण्यात आलं आहे.

मुंबई : राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारापाठोपाठ मंत्र्यांचं खातं वाटप करण्यात आलं आहे. खाते वाटपातही उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचाच दबदबा दिसून आला आहे. चंद्रकांत पाटील यांना यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण खातं देण्यात आलं आहे. राज्याचं अर्थमंत्रीपद भूषविलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना वन खातं देण्यात आलं आहे. या आधी युतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ आणि वन खाते होतं. त्यामुळे त्यांच्याकडे यावेळी महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल असं सांगितलं जात होतं. मात्र, मुनगंटीवार यांना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे खातं देण्यात आलं आहे. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. त्यामुळे यावेळी त्यांना महसूल खाते दिले जाईल असं सांगितलं जात होतं. चंद्रकांतदादा माजी प्रदेशाध्यक्ष होते. चार दिवसांपूर्वीच त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं. पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य हे खातं देण्यात आलं आहे.

Published on: Aug 14, 2022 05:49 PM
Vinayak Mete : अपघात कसा घडला, विनायक मेटेंच्या चालकाची पोलीस चौकशी करणार
Eknath Khadse : नगरविकास सोडल्यास महत्त्वाचे खाते भाजपकडे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया