उद्धव ठाकरे यांचे दोन शिलेदार अडचणीत; भाजप नेत्याचं टीकास्त्र; म्हणाला, “कर नाही त्याला डर कशाला?”
उद्धव ठाकरे यांचे दोन शिलेदार अडचणीत आले आहेत. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
पुणे, 5 ऑगस्ट 2023 | उद्धव ठाकरे यांचे दोन शिलेदार अडचणीत आले आहेत. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी यांचीही चौकशी झाली आहे. ईडीचा कायदा 2005 मध्ये पारित झाला, 2014 पर्यंत 2200 गुन्हे दाखल झाले, यात अनेक नेत्यांची चौकशी झाली आहे. हे डरपोट लोक आहेत. यांना भीती वाटते आपलं बिंग फुटलं तर काय ? कर नाही त्याला डर नाही. चूक नसेल तर घाबरण्याचं कारण काय? अशा चौकशा भाजप नेत्यांच्याही झाल्या. देवेंद्र फडणवीस यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती.”
Published on: Aug 05, 2023 03:47 PM